एम.पी.एस.सी.परीक्षेत मुलींमध्ये महाराष्ट्रात प्रथम आलेल्या ‘शिवराज’ची माजी विद्यार्थिनी अक्षता कुपटे यांचा सत्कार

KolhapurLive


गडहिंग्लज : एम.पी.एस.सी. परीक्षेमध्ये मुलींमध्ये महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकपदी शिवराज महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी अक्षता कुपटे यांची निवड झाली.

या अभिनंदनीय निवडीबद्दल माजी विद्यार्थिनी कु. अक्षता कुपटे यांचा सत्कार संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी अभिनंदन केले. यावेळी केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ. ए. एम. हसुरे, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा. एन. बी. एकिले, प्रा. अशोक मोरमारे, प्रा. विश्वजित कुराडे आदी यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.