पाकिस्तानातून आलेले तीन दहशतवादी मुंबईत घुसले? कोणी दिली पोलिसांना माहिती

KolhapurLive

मुंबईत पाकिस्तानातून आलेले तीन दहशवादी घुसले आहे, असा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला अन् मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले. फोन करणाऱ्या व्यक्तीने मोबाईल नंबर व गाडीचा क्रमांकाही दिला आहे. फोन करणाऱ्याने आपले नावसुद्धा सांगितले आहे. आता हा फोन खरा आहे की खोटा? याच्या तपासाला मुंबई पोलीस लागले आहे. अनेकदा फेक कॉल नियंत्रण कक्षाला केले जातात. तसाच हा प्रकार तर नाही ना? हे तपासून पाहिले जात आहे.

एका व्यक्तीने मुंबई पोलिस कंट्रोलला फोन करून दावा केला की, मुंबईत दुबईहून तीन दहशतवादी आले आहेत. या दहशतवाद्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे. फोन करणार्‍या व्यक्तीने पोलिसांना दहशतवाद्याचे नावही सांगितले आहे. मुजीब सय्यद नावाचा दहशवादी आला असून त्याचा मोबाईल क्रमांक आणि वाहन क्रमांकही पोलिसांना दिला. राजा ठोंगे असे फोन करणाऱ्याचे नाव असून त्याने कंट्रोल रूमला फोन केला. या कॉलनंतर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.

पोलिसांनी केला तपास सुरु

पोलिसांना फोन आल्यानंतर तपास सुरु केला आहे. फोन खरा आहे की खोटा? याचा तपास आधी करण्यात येत आहे. अनेकदा पोलिसांना निनावी फोन येत असतात. त्यात चुकीची माहिती दिली जाते, तसा हा प्रकार आहे का? की खरंच मुंबईत दहशतवादी घुसले आहे? हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.