गडहिंग्लजला बाळूमामा, हालसिद्धनाथ देवाचा भंडारा महोत्सव

KolhapurLive

गडहिंग्लज : गडहिंग्लज येतील संत बाळूमामा आणि श्री हालसिद्धनाथ देवाचा भंडारा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दिनांक 21 ते 18 एप्रिल अखेर विविध कार्यक्रम होणार आहेत.महोत्सवाच्या कालावधीत सायंकाळी मंदिर परिसरात बाळूमामा यांच्या अमृत चरित्रावरील प.पू. श्री. मलिकअर्जुन महाराज भोजकर याचे प्रवचन होणार आहे. बुधवार 26 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मेजर विक्रम जगताप यांचे प्रवचन होणार आहे. शुक्रवार दिनांक 28 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता पालखी सोहळा नगरप्रदक्षिणा होणार आहे. रात्री वाघापूरचे डोणे महाराज यांची भाकणूक होणार आहे. शनिवारी दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून भक्तांसाठी महाप्रसादचे वाटप होणार आहे. हा महोत्सव संत बाळूमामा, हालसिद्धनाथ मंदिर सेवा संस्था यांच्यावतीने घेतल्या जात असून भक्तांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.