गडहिंग्लजमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्याहस्ते २ कोटी कामांचा शुभारंभ

KolhapurLive

गडहिंग्लज : माजी ग्रामविकास मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी ह्याआधीच गडहिंग्लज फुटबॉल ला प्रोत्साहन देण्यासाठी व इतर खेळांना देखील वाव देण्यासाठी वडरगे रोड येथील कृषी कार्यालयनजीक क्रीडा संकुलसाठी निधी मंजूर करून आणला आहे.

   रविवारी दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी ह्या क्रीडा संकुलाचा शुभारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. ह्या फुटबॉल ग्राऊंडसाठी जवळपास १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच गडहिंग्लज शहरातील विविध ठिकाणी अनेक विकासकामांचा लोकार्पण शुभारंभ देखील होणार आहे व त्यासाठी तब्बल २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या लोकार्पण शुभरंभास उपस्थित रहावे व ह्याची शुभ वाढवावी आडे आवाहन गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे.