गडहिंग्लज ता. २६ : येथील केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयातर्फे हनिमनाळ (ता. गडहिंग्लज) येथे आरोग्य तपासणी शिबिर झाले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग योजनेंतर्गत झालेल्या शिबिरात १५० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने हेे शिबिर झाले.
सरपंच वीणा पाटील व उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. जयेंद्र चराटे, उदय पाटील, बाळासाहेब पाटील, पांडुरंग कुरळे, सुभाष राजमाने उपस्थित होते. डॉ. नीलेश राजमाने, डॉ. मोनिका एखंडे, डॉ. हिम्मत पाटील, डॉ. धनश्री कुंभार यांनी रुग्णांची तपासणी केली.