गडहिंग्लज, ता. २४ : सांगली, कोल्हापूर व सातारा स्पोर्टस् आणि अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसीच्यावतीने झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. मुलींच्या एकेरी सामन्यात पूर्वा मिसाळ विजेती ठरली. मुलांच्या एकेरी सामन्यात संकेत मगदूम रनरअप, तर मुलांच्या दुहेरी सामन्यात संकेत मगदूम व राजभूषण पाटील विजयी ठरले. प्रा. प्रणव सावेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.