गडहिंग्लज : केंद्रीय मंत्री रामदास आठवले दि. १० एप्रिल रोजी गडहिंग्लजच्या दौऱ्यावर येणार आहेत. आरपीआय गडहिंग्लज तालुक्याच्या वतीने येथील मंत्री हॉलमध्ये मल्लाप्पाणा कांबळे, शंकर सूर्यवंशी,गौराबाई सलवादे, राम सलवादे यांना अभिवादन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबत तालुकाअध्यक्ष दिलीप कांबळे यांनी बैठक घेऊन दौरा यशस्वी करण्याची नियोजन करण्यात आले आहे. यावेळी नेते प्रा. शहाजी कांबळे, मंगलराव माळगे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, महिला अध्यक्ष रूपाताई वायदंडे,अविनाश शिंदे,रमेश शिंत्रे, गणेश कांबळे यांच्यासह अन्य उपस्थित राहणार आहेत.