भारत-पाकिस्तान सामना आज किती वाजता व कुठे Live पाहता येणार?

KolhapurLive

   आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ ही स्पर्धा यंदा दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली जात आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील आपला पहिला सामना १२ फेब्रुवारीला पाकिस्तान संघाविरुद्ध खेळणार आहे. भारत- पाकिस्तान सामना म्हंटलं की साहजिकच प्रत्येकाला उत्सुकता असते. आजवर टी २० विश्वासचषकात मेन इन ब्ल्यूने पाकिस्तानला अनेकदा धूळ चारली आहे. तर महिला संघाच्या बाबत टी-20 विश्वचषकात, दोन्ही संघांचा एकमेकांविरुद्ध हा सातवा सामना असणार आहे. सहा पैकी चार सामने जिंकून भारत पाकिस्तानविरुद्धच्या विक्रमात आघाडीवर आहे. तसेच एकूणच टी-२० मध्ये भारत पाकिस्तानवर १०-३ ने आघाडीवर आहे. आजच्या केप टाऊन मधील सामन्याची वेळ, हा सामना कुठे पाहता येणार व संभाव्य टीम ११ विषयी आपण जाणून घेऊयात.
    टी २० महिला वर्ल्ड कप: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी (१२ फेब्रुवारी) होणार आहे.IND vs PAK सामना किती वाजता सुरू होईल?
चाहत्यांनी लक्षात ठेवावे की सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कसा पाहायचा?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर पाहता येईल.
  

भारतीय महिला संभाव्य संघ

जेआय रॉड्रिग्स, एच देओल, शेफाली वर्मा, एच कौर(सी), डीबी शर्मा, डीपी वैद्य, रिचा घोष, एस पांडे, पी वस्त्राकर, रेणुका सिंग, के अंजली सरवानी

राखीव : यस्तिका भाटिया, एस मंधना, एस मेघना, स्नेह राणा, आर एस गायकवाड, राधा यादव, मेघना सिंग


पाकिस्तानी महिला संभाव्य संघ

जावेरिया खान, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, निदा दार, बिस्माह मारूफ(सी), कैनत इम्तियाज, मुनीबा अली, सिद्रा नवाज, नशरा संधू, सना फातिमा, आयमान अन्वर

राखीव : सिद्रा अमीन, आयेशा नसीम, ​​तुबा हसन, सादिया इक्बाल, सदफ शमास, गुलाम फातिमा

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडिया पूर्णतः सज्ज असल्याची माहिती दिली. तसेच भारतीय संघ यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध खेळला आहे, त्यामुळे त्यांना काय करावे हे माहित आहे. अपेक्षा आणि वातावरण कसे आहे याची त्यांना पूर्ण कल्पना आहे.

 दरम्यान, या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाला भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधानाची उणीव भासू शकते. बोटाच्या दुखापतीमुळे बाहेर पडली आहे. कानिटकर पुढे म्हणाले की, मंधाना भारताच्या दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.

     

‌‌‌‌‌‌