रोहित-विराटची गेल्या १० वर्षांतील आंतरराष्ट्रीय आकडेवारी (23 फेब्रुवारी २०२३ ते २३ फेब्रुवारी २०२३) –
गेल्या १० वर्षात रोहित शर्माने एकूण ३१३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ३४२ डावांमध्ये त्याने ४६.४च्या सरासरीने एकूण १४३५९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ४१ शतके आणि ७३ अर्धशतके झळकावले आहेत. त्याचबरोबर त्याने आपल्या बॅटने एकूण १४०८ चौकार आणि ४७९ षटकार लगावले आहेत.
तसेच विराट कोहलीने गेल्या १० वर्षात ३५९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या एकूण ४१० डावांमध्ये त्याने ५६.२च्या सरासरीने १९४०२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५७ शतके आणि ९८ अर्धशतके झळकावली आहेत. गेल्या १० वर्षात विराट कोहलीने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकूण १९११ चौकार आणि २४२ षटकार निघाले आहेत.
आतापर्यंत दोघांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अशी राहिली –
रोहित शर्माने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण ४७ कसोटी, २४१ एकदिवसीय आणि १४८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने ४६.७६ च्या सरासरीने ३३२० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ९ शतके आणि १४ अर्धशतके झळकावली आहेत.
याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८.९१ च्या सरासरीने ९७८२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ३० शतके आणि ४८ अर्धशतके झळकावली आहेत. त्याच वेळी, टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये, रोहित शर्माने ३१.३२ च्या सरासरीने आणि १३९.२४च्या स्ट्राइक रेटने ३८५२ धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण १०६ कसोटी, २७१ एकदिवसीय आणि ११५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने ४८.४९ च्या सरासरीने ८१९५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २७ शतके आणि २८ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ५७.६९च्या सरासरीने १२८०९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ४६ शतके आणि ६४ अर्धशतके झळकावली आहेत.
तर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये कोहलीने ५२.७३च्या सरासरीने आणि १३७.९६च्या स्ट्राइक रेटने ४००८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १ शतक आणि ३७ अर्धशतके केली आहेत.