गडहिंग्लज : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.खासदार मलिकार्जुन खरगेजींच्या उच्च आदर्शानुसार काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. आमदार श्री. नानाभाऊ पटोले अध्यक्ष. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्या दृष्टिकोनातून समाजाच्या सर्व स्थरातील व विशेषतः तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचवणे आवश्यक आहे. तोच विचार घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे काम सुरू आहे.
या संदर्भात आपल्यावर प्रशांत देसाई यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येत आहे.आपणास कळविण्यात आनंद होतो की काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीमध्ये गडहिंग्लज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे.
मा. खासदार मलिकार्जुन खर्गेजींच्या दृष्टिकोनातून, त्यांच्यासमोर असलेली उद्दिष्टे व त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या तालुक्याचे महत्त्व ओळखून व सुयोग्य असे काम करून काँग्रेस पक्षाची प्रतिमा जन माणसात उज्वल कराल असा मला विश्वास वाटतो असे त्यांच्या निवडीच्या पत्रकात म्हटले आहे.