गडहिंग्लज, ता.३० : बाळासाहेबाची शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. कामाच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना घराघरात पोचवा, असे आव्हान नियोजक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर त्यांनी केले. तालुक्यातील पक्षांचे नूतन पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाप्रमुख राजेखान जमादार अध्यक्षस्थानी होते.
श्री.क्षीरसागर म्हणाले, ' केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे. यामध्ये कुठेही कमी पडू नका. राज्यात सत्ता असल्याने निधीची कमतरता भासणार नाही. ' श्री जमादार यांचेही भाषण झाले. जिल्हा नियोजना समितीचे सदस्य अंकुशराव निपाणीकर, उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर किशोर घाटगे, गडहिंग्लज उपसंपर्क प्रमुख सागर मांजरे शहरप्रमुख अशोक शिंदे, कागल तालुकाप्रमुख सुधीर पाटोळे, अमोल नार्वेकर,राहुल खोत,उदय मंडलिक उपस्थित होते. तालुकाप्रमुख संजय संकपाळ यांनी प्रास्ताविक केले.आदर्श विचारे यांनी सूत्रसंचालन केले. शहरप्रमुख अशोक शिंदे यांनी आभार मानले.