गडहिंग्लज : साहित्य लेखन यावर एकदिवशीय कार्यशाळा ओंकार महाविद्यालय व राजश्री शाहू कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडली. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. यावेळी भितीपत्रकाचे अनावरण बाळासाहेब गुरव यांनी केले .डॉ सुनंदा शेळके यांनी विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचली पाहिजे, गझल कवितेला आपलंसं केले पाहिजेत असे सांगितले. डॉ. शर्मिला घाडगे यांनी स्वागत केले. प्रा. भीमराव शिंदे यांनी परिचित तर प्रा.क्रांती शिवणे यांनी आभार मानले. धनंजय घुले, रेखा पोजदार, समीर कुलकर्णी,प्रा.कविता पोळ प्रा. सचिन पाटील आदी उपस्थित होते.