महाविकास आघाडीचे नेते रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात”; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

KolhapurLive

महाविकास आघाडीचे नेते रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात, असा गौप्यस्फोट शिंदे गटातील बुलढाण्याचे खासदार प्रताराव जाधव यांनी केला आहे. सुप्रिया सुळे-अब्दुल सत्तार वादावरून आधीच महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गट आमने-सामने आले असताना आता प्रतापराव जाधव यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदारच नाही, तर अनेक खासदारही अस्वस्थ आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रात्री-बेरात्री भेटत असतात. तसेच आमच्या अनेक मंत्र्यांचीही सह्यांद्रीवर जाऊन भेटत घेतात. हे मी स्वत: अनुभवलं आहे”, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.