‘रसना’चे संस्थापक अरिज पिरोजशा खंबाटा यांचं शनिवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. रसना ग्रुपच्यावतीने सोमवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. “भारतीय उद्योग, व्यापार आणि सामाजिक विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले,” असेही निवेदनात म्हटले आहे.
अरिज खंबाट्टा बेनेव्होलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्षही होते. ते WAPIZ (वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी जरथोस्ती) चे माजी अध्यक्ष आणि अहमदाबाद पारसी पंचायतीचे माजी अध्यक्ष देखील होते.