आजरा : सकेश्वर - बांदा महामार्ग बाधित शेतकरी, नागरिक व छोटे व्यापारी यांच्या प्रश्नसंदर्भात चर्चा करण्यासाठी भुदरगडच्या उपअधिकार वसुंधरा बारवे यांनी बैठक आयोजित केली आहे. येथील तहसीलदार कार्यालयात शुक्रवारी ( ता .१८) सकाळी 11 वाजता बैठक होईल. याबाबतचे पत्र बारवे यांनी यांनी दिल्याची माहिती आंदोलनाचे समन्वयक संपत देसाई यांनी दिली. किसान भवनात बाधित शेतकऱ्यांचा मेळावा झाला होता. मेळाव्यानंतर शिष्टमंडळांने बारवे यांची भेट घेऊन तत्काळ बैठकीचे आयोजन करण्याविषयी मागणी केली होती. आज त्याच बाबतीचे पत्र दिल्याचे देसाई यांनी सांगितले.