चन्नेकुपी येथील युवकावर बेलेवाडी घाटात प्राणघातक हल्ला

KolhapurLive


कारखान्याकडे उस घेऊन चाललेल्या आकाश बाबूराव पाटील (रा. चन्नेकुपी ) याच्यावर अज्ञातानी बेलेवाडी घाटात तलवारीने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गडहिग्लज येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. 

      ऊसतोड बंद असल्याने रात्री त्यांनी ट्रॅक्टर मध्ये ऊस भरुन सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याकडे जात होते.बेलेवाडी घाटात त्यांच्या वर अज्ञातांनी तलवारीने हल्ला केला त्यांच्या हात पाय, पोट व डोक्यावर वार झाले आहेत.गंभीर जखमी झाल्याने त्यांना गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी अवस्थेत पाटील असल्याने अद्याप पोलीसांनी त्यांचा जबाब घेतलेला नाही.त्यामुळे हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.