उद्या गडहिंग्लज मध्ये नुतन संचालकाचा सत्कार व आभार मेळावा

KolhapurLive


गडहिंग्लज : आप्पसाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना निवडणूकीमध्ये आमदार हसन मुश्रीफ  व डाॕ प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखाली श्री. छञपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे सर्व 19 उमेदवार मोठ्या मताअधिक्याने निवडून दिल्याबद्दल सभासद बाधवांचे आभार व नुतन संचालकांचा सत्कार तसेच पॕनल प्रमुखांचा सत्कार आमदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या शुभहस्ते गुरुवार दिंनाक 10-11-2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजता लक्ष्मी चौक, गडहिंग्लज येथे आयोजित केला आहे या मेळाव्यास माजी आमदार संध्यादेवी कुपेकर,डाॕ प्रकाश शहापूरकर,प्रकाश चव्हाण,प्रा.किसनराव कुराडे,राजेंद्र गड्यान्नावर,मा.आप्पी पाटील,संग्रामसिंह कुपेकर,मा.हेमंत कोलेकर,सोमगोंडा आरबोळे, किरणराव कदम, सिध्दार्थ बन्ने, रमेश रिंगणे चंद्रकांत सावंत, नागेश चौगुले, बसवराज आजरी,संतोष चिकोडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे तरी सभासद बंधूनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती श्री शाहू शेतकरी समविचारी आघाडीतर्फे करण्यात आला आहे.