आजरा - आजरा तालुक्यतील सोहाळेपैकी बाची येथील शेळकुंडी नावाच्या शेत परिसरात गेले दोन दिवसापासून एक गवा तळ ठोकून आहे . हुसकावून लावण्याकरिता गेलेल्या शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर गवा धावून येत आहे गवा आजारी असून त्याला अंगावर फोड आले आहेत तो अशक्त असून लंपी सारख्या आजाराच्या अंदाज आहे. गवा धावून येत असल्यामुळे गव्याला नेमके कोणता आजार झाला आहे स्पष्ट होत नसल्याचे वन विभागाने सांगितले जाते.
सहाळेपाकी बाची येथील बाळासाहेब दोरुगडे , मारुती पेडणेकर व कोंडुसकर यांच्या शेळकुंडी केळशेत नावाच्या परिसरात गेले दोन दिवसापासून गवा तळ ठोकून आहे .शनिवारी ( दिनांक . २६ ) दुपारी शेतकऱ्यांना गव्याचे दर्शन झाले. त्यांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा अंगावर धावून आला. त्यानंतर तात्काळ त्यांनी माहिती वनविभागला देण्यात आली वनविभागाचे वनपाल बाळेश न्हावी , सुरेश पताडे यासह वनकर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांच्या दक्षतेचे आव्हान केले. वन कर्मचाऱ्यांनीही त्याला हुसकवून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र उलट त्याने अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. दिवसभर वन कर्मचारी गवळ्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते.