गडहिंग्लज येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालय तालुका विधी सेवा समिती गडहिंग्लज यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत दाखल पूर्व प्रकरणे, दिवाणी व फौजदारी अशा एकूण ५७ प्रकरणे तडजोड होऊन १ कोटी १३ हजार ९०१ रुपये वसूल झाले आहेत. राष्ट्रीय लोक अदालतिला चांगला प्रतिसाद मिळाला.
जिल्हा न्यायाधीश २ ए. आर. उबाळे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) जी. व्ही. देशपांडे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एम.टी. खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पॅनल करण्यात आले होते. यामध्ये न्यायाधीश उबाळे यांनी ८, न्यायाधीश देशपांडे यांनी २३ आणि न्यायाधीश खराडे यांनी १७ अशी प्रकरणे निकाली काढली.अशी एकूण ५७ प्रकरणी निकाली निघाली आहेत. या लोक अदालतीत ऍड रेहाना म्हाबर्जी,ऍड राजश्री नांदवडेकर, ऍड संगीता पाटील, न्यायालयीन कर्मचारी संजय साळुंखे, सहायक अधीक्षक पाटील, लघुलेखक सुधा तांबवेकर ,दीपक चौगुले, एस आर कांबळे यांच्यासह कर्मचारी अधिकारी यांनी भाग घेतला.