पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवण्यानंतर भारतीय संघ आज टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये आपला दुसरा सामना नेदरलँड्सविरोधात खेळणार आहे. सिडनी येथील क्रिकेट मैदानात भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता हा सामना सुरु होणार आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवताना भारतीय संघाचं लक्ष दुसऱ्या गटामधील गुणतालिकेमध्ये वरचा क्रमांक पटकावण्यासाठी धावगती वाढवण्यावर नक्कीचअसेल. पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताने अगदी शेवटच्या चेंडूंवर जिंकला असून भारतीय संघाचं नेट रनरेट ०.०५० इतकं आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही गटांमधून प्रत्येकी दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे नेट रनरेट वाढवून अव्वल स्थानी राहण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
भारत आणि नेदरलँड्समध्ये आतापर्यंत एकही टी-२० अंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. दोन्ही संघ पहिल्यांदाच टी-२० प्रकारामध्ये आमने-सामने असतली. भारत आणि नेदरलँड्सदरम्यान १९ वर्षांपूर्वी दोन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. भारताने त्यानंतर २०११ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये नेदरलँड्सविरोधात सामना खेळला होता.
भारतीय संघाने या स्पर्धेची केलेली दमदार सुरुवात आणि सर्व आकडेवारी पाहता नेदरलँड्सचा संघ दुबळा वाटत असला तरी ते भारतीय संघाला चांगलं आव्हान देऊ शकतात असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतारोधातील सामन्यामध्ये नेदरलँड्सचा वेगवान गोलंदाजस बास डे लीडेच्या कामगिरीकडे अनेकांचं लक्ष असेल. बास डे लीडने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये नऊ गडी बाद केले आहेत. त्याशिवाय त्याने फलंदाजीच्या माध्यमातूनही संघासाठी योगदान दिलं आहे. तर नेदरलँड्सचा सलामीवीर मॅक्स ओडॉडने ४५.६७ च्या सरासरीने १३७ धावा केल्या आहेत.
नेदरलँड्सने विश्वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंडच्या संघाला दोनदा धूळ चारली आहे. २००९ आणि २०१४ च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी इंग्लंडला पराभूत केलं होतं. त्यांनी सुपर १२ च्या सामन्यामध्ये बांगलादेशला विजयासाठी अगदी रडवलं होतं. शेवटच्या क्षणी बांगलादेशला या संघाविरोधात निसटता विजय मिळाला होता.
🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*
🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE
Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.
Admission Open for Offline & Online Batches.
👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा.
📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |
📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.