नवी दिल्ली: फोर्ब्सने श्रीमंत भारतीयांची (indian) यादी जाहीर केली आहे. या यादीत सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून गौतम अदानी (Gautam Adani) यांना स्थान मिळालं आहे. गौतम अदानी यांनी या यादीत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनाही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे या यादीत अनेक बदल झाले आहेत. आपल्या कंपनीची शेअर बाजारात लिस्टिंग करणाऱ्या नाएकाच्या प्रमुख फाल्गुनी नायर यांनीही या यादीत स्थान मिळालं आहे. तर स्टॉक मार्केटमध्ये खास कामगिरी करू न शकलेले पेटीएमचे विजय शेखर शर्मा हे टॉप शंभर श्रीमंताच्या यादीत स्थान मिळवू शकलेले नाहीत.
शेअर मार्केटमध्ये चांगली कामगिरी केल्याने अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार अदानी यांची संपत्ती दुप्पट वाढून 150 अब्ज डॉलर म्हणजे 150 कोटीची संपत्ती झाली आहे.तर 2013मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले मुकेश अंबानी हे दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांची संपत्ती 88 अब्ज डॉलर झाली आहे.
गेल्या वर्षी त्यांची एकूण संपत्ती 92.7 डॉलर एवढी होती. फोर्ब्सच्या यादीनुसार देशातील 100 लोकांची एकूण संपत्ती 600 अब्ज डॉलर म्हणजे 3,360 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संपत्ती 25 अब्ज डॉलरने वाढली आहे.
या यादीत तिसऱ्या स्थानावर राधाकृष्ण दमानी आणि त्यांचे कुटुंब आहे. त्यांची संपत्ती 27.6 अब्ज डॉलर म्हणजे 2760 कोटी आहे. तर 21.5 अब्ज डॉलर म्हणजे 2150 कोटी संपत्तीसह सायरस पूनावाला हे चौथ्या स्थानावर आहे. त्या शिवाय शिव नादर हे पाचव्या स्थानावर गेले आहेत. त्यांची स्ंपत्ती 21.4 अब्ज डॉलर म्हणजे 2140 कोटी आहे.सावित्री जिंदल या 16.4 अब्ज डॉलर म्हणजे 1640 कोटी संपत्तीसह सहाव्या स्थानी आहेत. 15.5 अब्ज डॉलरच्या म्हणजे 1550 कोटीच्या संपत्तीसह दिलीप सांघवी आणि त्यांचं कुटुंब सातव्या स्थानी आहे.
हिंदुजा बंधू या यादीत आठव्या स्थानी आहे. त्यांची संपत्ती 15.2 अब्ज डॉलर म्हणजे 1520 कोटी आहे. कुमार बिरला हे नवव्या स्थानी असून त्यांची संपत्ती 15 अब्ज डॉलर म्हणजे 1500 कोटी आहे. तर बजाज कुटुंब हे दहाव्या स्थानी आहे. त्यांची संपत्ती 14 अब्ज डॉलर म्हणजे 1400 कोटी आहे.
🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*
🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE
Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.
Admission Open for Offline & Online Batches.
👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा.
📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |
📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.