कोल्हापूर : लम्पी रोगग्रस्त भटक्या गाईंवर उपचार करणारी राज्यातील पहिली छावणी जनावरांसाठी आश्रयस्थान ठरली आहे. या पहिल्या छावणीत ५० भटक्या गाई उपचार घेत असून बऱ्याच गाईंवर उपचार झाले आहेत. लम्पीग्रस्त भटक्या जनावरांच्या उपचारावर अन्यत्र प्रश्नचिन्ह लागले असताना इचलकरंजीतील ‘माणुसकी फाऊंडेशन’च्या छावणीतील गोसेवा दखलपात्र ठरली आहे.
जनावरांचा लम्पी त्वचारोग प्रादुर्भाव सध्या चर्चेत आहे. हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. ताप येणे, त्वचेवर गाठी येणे अशी लक्षणे दिसून प्राण्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. याचा वाढलेला प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असला तरी त्याची तीव्रता अजून संपलेली नाही. गोठय़ातील लम्पी त्वचारोगग्रस्त गाई, म्हशी यांच्यावर उपचार करण्याबाबत पशुपालक सतर्क असल्याने त्यांच्यावर वेळीच उपचार होतात. तथापि भटक्या जनावराबाबत उपचाराचे काय करायचे, हा मुद्दा मात्रलटकलेला आहे. काही शहर, गावांमध्ये भटक्या जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. केवळ लसीकरण होण्याऐवजी रोग समूळ बरा होणे गरजेचे आहे. असे होत नसल्याने लम्पी त्वचारोगग्रस्त भटक्या जनावरांचे मृत्यूचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून आले आहे.
अडथळय़ातही गोसेवा अहर्निश सुरू
ही बाब लक्षात घेऊन इचलकरंजीतील माणुसकी फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या तरुणांनी इचलकरंजी येथे लम्पी त्वचारोगग्रस्त भटक्या गाईंवर उपचार करणारी छावणी सुरू केली आहे. गेले महिनाभर महापालिकेच्या राजीव गांधी भवनच्या आवारातील छावणीत सध्या पकडून आणलेल्या ५० लम्पी त्वचारोगग्रस्त गाईंवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत लम्पीमुक्त झालेल्या ४० गाईंना (भटक्याच असल्याने) सोडून देणे भाग पडले आहे. सहा ते सात भटक्या गाईंचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.गाई नेमक्या कोणत्या भागात पकडल्या आहेत याची नोंद छावणीत असते. गाईंवर डॉ. चिखबीरे, डॉ. वाघमोडे यांनी लसीकरण केले आहे, तर डॉ. अनिरुद्ध माने यांनी तीन दिवसांचे उपचार प्रशिक्षण फाऊंडेशनच्या तरुणांना दिले आहे. त्यांनी बनवलेला आयुर्वेदिक लेप तरुण मुले जनावरांच्या तोंडात हात घालून लावताना कचरत नाहीत की जनावरांच्या जखमा स्वच्छ करणे, त्यातील अळय़ा बाहेर काढतानाही ते विचलित होत नाहीत. हे दृश्य पाहताना नागरिकांच्या अंगावर शहारे आणणारे असले तरी तरुणाई गो-सेवा करण्यात मग्न आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून ते पहाटे ३ पर्यंत ६० तरुणांचे पथक या कामात व्यग्र आहे. भटक्या गाईंना वैरण घालणे, उपचार, स्वच्छता अशी सेवा भर पावसात अहर्निश सुरू आहे.
पशुसंवर्धन विभागाची मदत अपेक्षित
सध्या येथे जनावरांची संख्या मोठी असल्याने नियमितपणे पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी येऊन पाहणी उपचार करणे गरजेचे असल्याच्या भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. भटक्या गाईंच्या उपचार, संगोपनासाठी लागणारा वैरण, औषध यांचा खर्च पदर मोडून स्वयंसेवक करत आहे.
🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*
🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE
Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.
Admission Open for Offline & Online Batches.
👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा.
📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |
📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.