औरंगाबाद (Aurangabad) पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे मुंबईत दाखल झाले आहेत. हृदयविकाराच्या झटक्यानंतर (Heart Attack) संजय शिरसाट यांना विशेष एअर एम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलं. औरंगाबादमध्ये सोमवारी शिरसाट यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र औरंगाबादमधील रुग्णालयातून शिरसाट यांना आता थेट मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मंगळवारी सकाळी तातडीने त्यांनी त्यासाठी मुंबईत आणण्यात आलं
मुंबई विमानतळावर एअर ऍब्युलन्सनने दाखल झाल्यानंतर विमानतळावरील रुग्णवाहिकेतून त्यांना बाहेर आणण्यात आलं. त्यानंतर एका खासगी कार्डियाक रुग्णावाहिकेत त्यांना शिफ्ट करण्यात आलं. या कार्डियाक रुग्णवाहिकेतून त्यांना आता वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुंबई विमानतळावरील रुग्णवाहिकेतून कार्डियाक एब्युलन्समध्ये संजय शिरसाट हे स्वतः चालत गेले. सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या हाताला धरुन चालत जात शिरसाट हे स्वतः कार्डियाक रुग्णावाहिकेमध्ये चढताना दिसले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवत होता. तसंच काहीसा अशक्तपणाही संजय शिरसाट यांना आल्याचं समोर आलेल्या दृश्यांमध्ये दिसलं.
🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*
🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE
Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.
Admission Open for Offline & Online Batches.
👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा.
📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |
📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.