मोठी बातमी! मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुक लाईव्ह करत विष प्राशन

KolhapurLive

मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. फेसबुक लाईव्ह करत त्यांनी विष प्राशन केले आहे. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात एक ऑडिओ क्लीपही व्हायरल होत होती. दरम्यान, माझ्यावरील आरोप खोटे असून या ऑडिओ क्लीपची चौकशी करावी, अशी मागणी करत त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत

रमेश केरे पाटील हे मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये दोन व्यक्ती बोलत असल्याचे दिसतेय. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी केरे यांनी पैसे घेतले, असा आरोप या ऑडिओ क्लीमध्ये करण्यात आला होता. ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर माझा याच्याशी संबंध नसल्याचे केरे यांनी सांगितले होते. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून ही ऑडिओ क्लीप व्हायरल होत असल्यामुळे माझी बदनामी होत असल्याचे म्हणत रमेश केरे यांनी विष प्राशन केले. मुंबईत असताना त्यांनी विष प्राशन केले असून त्यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*

🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE

Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.

Admission Open for Offline & Online Batches.


👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप करा.

📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |

📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.