चंदगड प्रतिनीधी : माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत गरूडझेप युवा मंच इब्राहिमपूर यांच्या वतीने इब्राहिमपूर केंद्रिय प्राथमिक शाळेतील इय्यत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत स्वेटर आणि ओळखपत्रांचे वितरण चंदगड पंचायत समितीचे गटविकास आधिकारी चंद्रकांत बोडरे आणि चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रंसंगी बोलताना गटविकास अधिकारी यांनी गरूडझेप मंडळाने माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत राबविलेल्या कार्यक्रमाचे कौतूक केले.गटविकास आधिकारी म्हणाले की, प्रत्येक मुलात काहीतरी वैशिष्ट्ये असते त्याच वैशिष्ट्याला आकार देण्याचे कार्य शिक्षक प्राथमिक शाळेत शिक्षण देत असताना करत असतात.पटसंख्या कितीही असो शाळेतील प्रत्येक मुलांचा सर्वांगीण विकास घडण्यासाठी आमचे शिक्षक झटत असतात अशावेळी याच शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबविणे हे प्रेरणादायी असल्याच मत याप्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केल.यावेळी या कार्यक्रमासाठी योगदान देणार्या मंडळाच्या सर्व सदस्यांचा पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गतच शाळेला वजन काटा तसेच कचरा व्यवस्थापन पेटी देखील भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाला केंद्रिय प्राथमिक शाळा इब्राहिमपूरचे केंद्र प्रमुख मोहन नाईक, ग्रामपंचायत सरपंच निळकंठ देसाई, उपसरपंच तुकाराम हरेर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ कदम,अनुप शिरोळकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन बैनवाड सर यांनी केले तर आभार संजय कुंभार सर यांनी मानले.
🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*
🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE
Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.
Admission Open for Offline & Online Batches.
👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा.
📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |
📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.