मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर (Mumbai Pune Expressway Accident) पहाटे भीषण अपघात झाला. एका ट्रकने दुसऱ्या मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक (Truck Accident) दिली. यात एका ट्रकचा चालक जागीच ठार झाला. या अपघातामुळे पुणे मुंबई एक्स्प्रेस (Pune Mumbai Expressway) हायवेवरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता.
एक ट्रक चेन्नईहून मुंबईच्या दिशेने येत होता. या ट्रकने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर दुसऱ्या एका ट्रकला मागून धडक दिली. या ट्रकचा खोपोलीच्या जवळ अपघात झाला.पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चालकाला झोप येऊन डोळा लागल्यामुळे हा अपघात घडला असावा, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आता या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
ट्रक नं TN 77 D 9826 वरील चालक अनडुरोस अँथनी, रा.तामिळनाडू याचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने त्याने ट्रक नं MH 50 N 0977 ला पाठीमागून जोरात धडक दिली, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. या अपघातामध्ये ट्रक चालक हा गंभीर जखमी होऊन केबिनमध्ये अडकून होता. तिथेच त्याचा मृत्यू झाला. तर क्लिनर व्यंकट आचलम सुब्रमण्यम रा. तामिळनाडू याला किरकोळ दुखापत झाली.
हा अपघात इतका भीषण होता, ही एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर ज्या ट्रकला मागून धडक दिली, त्या मालवाहू ट्रकमधील सामानाचं नुकसान झालंय. दोन्ही ट्रक हे मुंबईच्या दिशेने जात होते. त्यावेळी पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवेवर खोपीलीच्या हद्दीत हा अपघात घडला.
या अपघातानंतर बोरघाट पोलीस आणि रेस्क्यू टीम तातडीने मदतीसाठी रवाना झाले. त्यांनी या मार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक तातडीने पूर्ववत करण्याचे प्रयत्न केला. आय आर बी पेट्रोलिंग, बोरघाट महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य हॉस्पिटलची आरोग्य यंत्रणा यांनी या अपघातात मदत केली.
या अपघातातून पुढे असणाऱ्या ट्रक चालकाचा जीव अगदी थोडक्यात वाचला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय बचावलेल्या ट्रक चालकाला या अपघातातून आला.
पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अनेकदा भीषण अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. त्यात या आणखी एका अपघाताची भर पडली आहे. पहाटेच्या वेळेस चालकांच्या डोळ्यावर अनेकदा झोप येते आणि त्यांना झोप आवरणंही कठीण जातं.पहाटेच्या वेळी शक्यतो गाडी काही वेळ थांबवणं, ब्रेक घेणं, झोप आली असेल तर विश्रांती घेणं, या गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो. पण तरिही थकलेल्या अवस्थेत गाडी चालवत राहिल्यामुळे अपघात होत असल्याचं या घटनेनं अधोरेखित केलंय.
🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*
🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE
Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.
Admission Open for Offline & Online Batches.
👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा.
📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |
📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.